शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

व्हॅलेंटाईन दिनाच्या आधीच युवकाने झाडली स्वत:वर गोळी; मृतदेहाजवळ आढळले पिस्तूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 4:02 PM

पिस्तूलमध्ये केवळ एकच रोहितने स्वत:वर झाडलेली गोळी होती, असे पोलिसांनी सांगितले. मृतदेहाची ओळख पटवून पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी हलविला. प्रेमप्रकरणातून आत्महत्या? केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला

ठळक मुद्देप्रेमभंगातून आत्महत्या प्रेमभंगातून स्वत:चे जीवन संपविणे हे अत्यंत दुर्दैवी

नाशिक : तरुणाईकडून कुठलाही विचार न करता अलीकडे टोकाचे पाऊल उचलले जाते. प्रेमभंगासारख्या कारणामधून सातपूर भागात एका २८वर्षीय युवकाने चक्क गावठी पिस्तूलद्वारे स्वत:वर गोळी झाडून घेत जीवनप्रवास संपविल्याची धक्कादायक घटना 'व्हॅलेंटाईन दिना'च्या पूर्वसंध्येला शनिवारी (दि.१३) सकाळी उघडकीस आली. या घटनेने नाशिक शहर हादरुन गेले आहे. काही दिवसांपूर्वीच इंदिरानगरमध्ये एका तरुणाने अशाच काहीशा कारणातून गळफास घेत आत्महत्या केली होती.प्रेमाची व्याख्या जो तो वेगवेगळ्याप्रकारे करतो; मात्र प्रेमापोटी आपले उभे आयुष्य धोक्यात घालणे हे शहाणपणाचे अजिबातच नाही. उभ्या आयुष्याचा कुठलाही विचार न करता प्रेमभंगासारख्या कारणातून स्वत:चे जीवन संपविणे हे अत्यंत दुर्दैवी असेच आहे. सातपूर कॉलनीमध्ये राहणारा रोहित राजेंद्र नागरे (२८,रा. शिवनेरी चौक) हा शनिवारी रात्री बारा वाजता अचानकपणे पल्सर दुचाकीने (एमएच १५-एफजे ४६८७) घराबाहेर पडला. सातपूर औद्योगिक वसाहत आणि भवर मळ्यामधून जाणाऱ्या नाल्यालगत एका कच्च्या रस्त्यावर झाडाखाली रोहितचा मृतदेह शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास आढळून आला. घटनेची माहिती सातपूर पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून देशी बनावटीचे पिस्तूल व रोहितची दुचाकी पोलिसांनी जाप्त केली. पिस्तूलमध्ये केवळ एकच रोहितने स्वत:वर झाडलेली गोळी होती, असे पोलिसांनी सांगितले. मृतदेहाची ओळख पटवून पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी हलविला. प्रेमप्रकरणातून आत्महत्या? केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. या घटनेची वार्ता सातपूर, गंगापूरसह परिसरात वाऱ्यासारखी पसरली. प्रारंभी युवकाची गोळी झाडून हत्या करण्यात आली का? असा संशयही व्यक्त झाला. त्यामुळे हत्या की आत्महत्या? अशी चर्चा सुरू झाली; मात्र पोलिसांनी याप्रकरणी तपास करत रोहितने स्वत: छातीवर एक गोळी झाडून आत्महत्या? केल्याचे निष्पन्न केले.रोहितचे कोणाशीही वाद नाही अन‌् पोलिसात नोंदही नाहीरोहित विरोधात पोलीस दप्तरी यापूर्वी काहीही नोंद आढळून आलेली नाही. त्याचे कोणाशीही वाद नसल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. पोलिसांनी शेवटचे फोन कॉल्स व इतर माहिती घेण्यासाठी रोहितचा मोबाईल ताब्यात घेतला असून मोबाईल मधील व्हॉटसअँप स्टेट्स तपासले असता सर्व स्टेट्स प्रेमभंग अथवा प्रेमप्रकरणाशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. यामुळे रोहितने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज सातपुर पोलिसांनी व्यक्त केला आहे. सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारीValentine Dayव्हॅलेंटाईन्स डेFiringगोळीबारDeathमृत्यू