साताळी येथील तरुणाचा शॉक लागून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 19:01 IST2020-10-27T19:00:28+5:302020-10-27T19:01:07+5:30
जळगाव नेऊर..साताळी( ता. येवला) येथील सुशिक्षित तरूण शेतकरी सागर मोहन कोकाटे( वय २२) यांचा आज दिनांक २७ दुपारी शेतातील गट नंबर ४ मथील विहीरीवरील इलेक्ट्रिक मोटार चालु करण्यासाठी गेला असता शॉक लागुन तरूणाचा दुर्दैवी अंत झाला .

सागर कोकाटे
जळगाव नेऊर..साताळी( ता. येवला) येथील सुशिक्षित तरूण शेतकरी सागर मोहन कोकाटे( २२) यांचा शनिवारी ( दि.२७) दुपारी शेतातील गट नंबर ४ मथील विहीरीवरील इलेक्ट्रिक मोटार चालु करण्यासाठी गेला असता शॉक लागुन तरूणाचा दुर्दैवी अंत झाला.
सागर पदवीचे शिक्षण पुर्ण करुन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीसाठी पुणे येथे खाजगी क्लासमध्ये शिक्षण घेत होता, पण लाँकडाऊन असल्याने साताळी येथे घरी शेती करत होतो. मयत सागरच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परीवार असून सागरच्या मृत्यूने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भिसे, पोलीस हवालदार वसंत हेंबाडे, पोलीस नायक अरुण गंभीरे पुढील तपास करत आहे.