शिवडे येथे वीज पडून तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2022 02:05 IST2022-06-23T02:04:32+5:302022-06-23T02:05:03+5:30

सिन्नर तालुक्यातील शिवडी येथे अंगावर वीज पडून २१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास घडली. रवींद्र आनंदा पवार (२१) रा. शिवडे असे मृत तरुणाचे नाव आहे.

Young man killed in lightning strike at Shivde | शिवडे येथे वीज पडून तरुणाचा मृत्यू

शिवडे येथे वीज पडून तरुणाचा मृत्यू

सिन्नर : तालुक्यातील शिवडी येथे अंगावर वीज पडून २१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास घडली. रवींद्र आनंदा पवार (२१) रा. शिवडे असे मृत तरुणाचे नाव आहे. रवींद्र हा आपल्या शेळ्या घेऊन परिसरात चारण्यासाठी फिरत होता. दुपारच्या दरम्यान शिवडे परिसरात अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची सुरुवात झाली. यावेळी रवींद्र गावातील जनता विद्यालयाच्या पाठीमागील जागेवर शेळ्या चारत होता. पाऊस सुरू झाल्याने तो जवळच असलेल्या एका झाडाखाली लपला. मात्र, त्याच वेळी झाडावर वीज पडल्याने रवींद्रला जोरदार झटका बसून, त्याचा जागीच मृत्यू झाला. ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी जात त्याला गावातील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. यानंतर सिन्नर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Web Title: Young man killed in lightning strike at Shivde