Young man killed in gas geyser explosion | गॅस गिझरच्या स्फोटात तरुणाचा मृत्यू

गॅस गिझरच्या स्फोटात तरुणाचा मृत्यू

सिडको : परिसरातील दौलतनगर भागात गॅस गिझरचा स्फोट झाल्याने एका तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सिडकोतील दौलतनगर येथील रहिवासी गौरव समाधान पाटील ( २७ ) शुक्रवारी (दि.१) दुपारच्या सुमारास घरातील स्नानगृहात अंघोळ करीत असताना ही दुर्घटना घडली. गॅस गिझरचा अचानक स्फोट झाला. त्यामुळे घरातील सदस्यांसह परिसरातील नागरिकांनाही सुरुवातीला धक्का बसला. स्फोटाचा आवाज ऐकून जमलेल्या परिसरातील नागरिकांच्या मदतीने या घटनेत गंभीर जखमी झालेले गौरव पाटील यांना त्यांच्या कुटुंबीयांनी जिल्हा शासकीय रुग्णलायात दाखल केले. मात्र गॅस गिझरचा स्फोट इतका भयंकर होता की या या स्फोटात गौरव पाटील गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना घेऊन त्यांचे नातेवाईक शासकीय रुग्णालयात दाखल झाले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार शांताराम शेळके करीत आहेत.

Web Title: Young man killed in gas geyser explosion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.