सेल्फी काढताना धरणात बुडून तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 00:08 IST2021-01-04T20:43:45+5:302021-01-05T00:08:11+5:30
कळवाडी : गिरणा धरणावर पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा सेल्फी काढताना तोल गेल्याने धरणात बुडून मृत्यू झाला.

सेल्फी काढताना धरणात बुडून तरुणाचा मृत्यू
चाळीसगाव येथील नयन रवींद्र शिरुडे हा तरुण पर्यटनासाठी मित्रांबरोबर गिरणा धरणावर आला होता. सुरक्षारक्षकाची नजर चुकवून तो धरणाच्या काठावर उभा राहून सेल्फी काढत असताना तोल जाऊन धरणात बुडून त्याचा मृत्यू झाला. मालेगावातील अग्निशमन दलाच्या शकील अहमद मोहंमद साबीर, रवींद्र शेजवळ, सुधाकर अहिरे, किरण सूर्यवंशी यांनी शोध घेऊन धरणातून त्याचा मृतदेह काढला. सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.