बोकटे येथे विहिरीत पडून तरूणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 00:32 IST2020-10-26T20:32:12+5:302020-10-27T00:32:29+5:30
येवला : तालुक्यातील बोकटे येथे विहिरीत पडून तरूणाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

बोकटे येथे विहिरीत पडून तरूणाचा मृत्यू
ठळक मुद्देचिखलामुळे पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहिरीत पडून बुडून वैभवचा मृत्यू
येवला : तालुक्यातील बोकटे येथे विहिरीत पडून तरूणाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
बोकटे येथील भाऊसाहेब भागवत यांचा एकुलता एक मुलगा वैभव भागवत (वय 24) सोमवारी, (दि. 26) दुपारी एक वाजेच्या सुमारास शेतातील विहिरी वर पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेला होता. यावेळी विहिरीजवळ असणार्या चिखलामुळे पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहिरीत पडून बुडून वैभवचा मृत्यू झाला. वैभव काही दिवसांपूर्वीच नाशिकहून गावी बोकटे येथे शेतीकरण्यासाठी आला होता.
याप्रकरणी तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.