पूूर्ववैमनस्यातून युवकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 22:00 IST2020-03-16T21:59:53+5:302020-03-16T22:00:35+5:30
मनमाड : येथील राजेंद्र आहिरे या तरुणाला पूर्ववैमनस्यातून येथील पाकिजा कॉर्नर या ठिकाणी लोखंडी रॉड, लाठ्याकाठ्याने मारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

पूूर्ववैमनस्यातून युवकाला मारहाण
मनमाड : येथील राजेंद्र आहिरे या तरुणाला पूर्ववैमनस्यातून येथील पाकिजा कॉर्नर या ठिकाणी लोखंडी रॉड, लाठ्याकाठ्याने मारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
याबाबत पोलिसांनी दखल घेऊन शुभांगी आहिरे यांच्या तक्रारीवरून शेखर पगारे, शुभम पगारे, वैभव पगारे, निकेश ओव्हळ यांच्यासह आदींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यापैकी सात जणांना अटक करण्यात आली असून, चार आरोपी फरार आहे.
पोलीस तक्रारदार व आरोपी यांच्यात अनेक दिवसांपासून पूर्ववैमनस्यातून वाद होते. राजेंद्र हा पाकिजा कॉर्नर येथे फिरत असताना आरोपींनी त्यास शिवीगाळ करत मारझोड केली.
यात तो गंभीर जखमी झाला. मालेगावच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सात आरोपींना अटक केली आहे.