ऑनलाइन अर्जासाठी महा ई-सेवा केंद्रांवर तरुणांची गर्दी

By Admin | Updated: May 6, 2014 22:16 IST2014-05-06T21:18:49+5:302014-05-06T22:16:53+5:30

पोलीस भरती : शहरात ४० ई-सेवा केंद्रे : बॅँकेतून चलन काढण्याचा वाचतोय त्रास

Young crowds at the Maha E-Seva Kendra for online application | ऑनलाइन अर्जासाठी महा ई-सेवा केंद्रांवर तरुणांची गर्दी

ऑनलाइन अर्जासाठी महा ई-सेवा केंद्रांवर तरुणांची गर्दी

पोलीस भरती : शहरात ४० ई-सेवा केंद्रे : बॅँकेतून चलन काढण्याचा वाचतोय त्रास
नाशिक : पोलीस आयुक्तालयात नव्याने भरती करण्यात येणार्‍या पोलीस शिपाई पदाच्या ४२३ जागांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास सोमवारपासून सुरुवात झाली़ मंगळवारी अर्ज भरण्यासाठी तरुणांनी महा ई-सेवा केंद्र तसेच सायबरमध्ये गर्दी केली होती़ दरम्यान, शहरात असलेल्या ४० महा ई-सेवा केंद्रांमुळे तरुणांची सोय झाली असून, बँकेतून चलन काढण्याच्या त्रासापासून त्यांची मुक्तता झाल्याचे तरुणांनी सांगितले़
नाशिक शहरात ४२३, तर ग्रामीण पोलीस दलात १९२ जागांसाठी शिपाई पदाची भरतीप्रक्रिया राबविली जाते आहे़ या पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ५ मे पासून ऑनलाइन अर्ज भरण्याची सूचना करण्यात आली असून, २५ मे रोजी रात्री दहा वाजेपर्यंत ते भरता येणार आहेत. शिपाई पदाचे ऑनलाइन अर्ज भरता यावेत यासाठी शहरात ४० महा ई-सेवा केंद्र असून, या ठिकाणांहून अर्ज भरणे तरुणांसाठी सुलभ झाले आहे़
शिपाई पदाच्या जाहिरात प्रसिद्ध केलेल्या संकेतस्थळावर शहरातील या ई-सेवा केंद्रांची माहिती व फ ोन नंबर देण्यात आल्यामुळे आपल्या जवळच्या भागात असलेल्या केंद्रावर जाऊन तरुण ऑनलाइन अर्ज भरत आहेत़ ई-सेवा केंद्रातून सर्व अर्ज व शुल्क भरले जात असल्याने तरुणांचा बँकेत जाऊन चलन काढण्याचा त्रासही कमी झाला आहे़ सायबरमध्ये जाऊन ऑनलाइन अर्ज भरणार्‍यांना सर्व्हर डाऊन असल्याच्या तक्रारी असून, ई-सेवा केंद्रामधून मात्र सुरळीतपणे अर्ज भरला जात असल्याचे काही तरुणांनी सांगितले़ (प्रतिनिधी)

Web Title: Young crowds at the Maha E-Seva Kendra for online application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.