Yoghurt canceled on corona background | कोरोना पार्श्वभूमीवर दहीहंडी रद्द

कोरोना पार्श्वभूमीवर दहीहंडी रद्द

लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : कोणार्कनगर येथील कोणार्कफाउण्डेशनच्या वतीने यंदा कोरोना संसर्ग लक्षात घेऊन गोकुळाष्टमीनिमित्ताने आयोजित करण्यात येणारा दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आला.
संपूर्ण देशात कोरोना संसर्ग वाढला असून, रु ग्णसंख्यादेखील झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रु ग्णांना लागणाऱ्या रक्ताचा तुटवडा पडत असल्याने मंडळाने सामाजिक भान ठेवत आणि शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून दहीहंडी उत्सव साजरा न करता त्याबदल्यात रक्तदान शिबिर आयोजित केले होते. मंडळाचे संस्थापक संदीप लभडे यांनी कार्यक्र माचे आयोजन केले होते.
यावेळी किरण मते, अशोक कळमकर, विलास वाघ, रोहित जाधव, उद्धव गांगुर्डे, दत्ता मराठे, योगेश माळोदे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Yoghurt canceled on corona background

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.