जागतीक शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी योगेश निकम यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 18:27 IST2018-09-09T18:27:35+5:302018-09-09T18:27:54+5:30

पुणे बालेवाडी येथे एशिया शरीरसौष्ठव स्पर्धा साठी होणाऱ्या निवड स्पर्धात इगतपुरी येथील हितेश आॅल्म्पीया व्यायाम शाळेतील भारत शरीरसौष्ठव खेळाडु योगेश निकम यांची ६५ किलो वजनी गटात निवड झाली

 Yogesh Nikam's selection for world body competition | जागतीक शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी योगेश निकम यांची निवड

जागतीक शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी योगेश निकम यांची निवड

इगतपुरी : पुणे बालेवाडीयेथे एशिया शरीरसौष्ठव स्पर्धा साठी होणाऱ्या निवड स्पर्धात इगतपुरी येथील हितेश आॅल्म्पीया व्यायाम शाळेतील भारत शरीरसौष्ठव खेळाडु योगेश निकम यांची ६५ किलो वजनी गटात निवड झाली व थायलँड येथे होणाºया जागतीक शरीर सौष्ठव स्पर्धासाठीही निवड झाल्यामुळे त्याचा हितेश आॅल्म्पीया व्यायाम शाळेत सत्कार करण्यात आला.
इगतपुरीचा भुमिपुत्र योगेश हा तालुक्याचा नव्हे तर महाराष्ट्र व देशाचा आभिमान आहे. त्यांचे पिताश्री नारायण निकम यांनी एशिया व भारत श्री पर्यंत शरीरसौष्ठव स्पर्धा जिंकल्या आज वडील आणि भावाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन योगेश यांनी सुध्दा जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धा पर्यंत मजल गाठली.
या वेळी प्रमुख पाहुणे माजी नगर सेवक तथा टेंम्पल जिम चे प्रमुख सतिष शर्मा, सत्कार मुर्ति योगेश निकम, आयोजक नारायण निकम, व्यायाम शाळेचे शरीरसौष्ठव खेळाडु यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्र माचे सुत्र संचालन नारायण निकम यांनी केले तर अतिष दोंदे यांनी आभार व्यक्त केले.

Web Title:  Yogesh Nikam's selection for world body competition

टॅग्स :Nashikनाशिक