जळगावनेऊरच्या जनता विद्यालयात योगदिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 18:46 IST2019-06-24T18:46:42+5:302019-06-24T18:46:59+5:30
जळगाव नेऊर : येथील जनता विद्यालयात जागतिक योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी योगाचे धडे गिरविले. अध्यक्षस्थानी शालेय समिती अध्यक्ष जयाजी शिंदे होते.

जळगावनेऊरच्या जनता विद्यालयात योगदिन उत्साहात
यावेळी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक चांगदेव खैरनार यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्व विशद केले तर शिक्षक संपत बोरनारे यांनी योगाचे धडे दिले. योगदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध आसने केली. याप्रसंगी नामदेव गायकवाड, भाऊसाहेब शिंदे, बाबासाहेब शिंदे ,सोमनाथ पानसरे , सी. एन. आहेर, सुनील पाटील, सुरेश शेळके, अरु ण जाधव, अण्णासाहेब सिनगर ,भाऊसाहेब सोनवणे, शिवाजी सोनवणे, वर्षा बोराडे, लोहकरे, बेंडकुळे ,शिंदे ,ठाकरे ,बोरनारे, सोनवणे आदिंसह विद्यार्थी उपस्थित होते.