फेसबुक लाइव्हद्वारे सिन्नरला योग प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 22:59 IST2020-06-22T22:17:00+5:302020-06-22T22:59:48+5:30

सिन्नर : शहरातील महालक्ष्मीनगर येथील योगशिक्षक वसंत गोसावी व जयश्री गोसावी यांनी सहाव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त फेसबुक लाइव्हवरून योग प्रात्यक्षिके सादर केला. कोरोना प्रादुर्भावामुळे प्रत्यक्ष योगवर्ग बंद असल्याने सोशल मीडियाचा आधार घेत त्यांनी फेसबुकचा आधार घेतला.

Yoga training to Sinnar via Facebook Live | फेसबुक लाइव्हद्वारे सिन्नरला योग प्रशिक्षण

सध्या खरीप हंगाम सुरू असल्याने जेवणासाठीदेखील वेळ मिळत नाही. मात्र, ‘आवड असली की सवड होते’ या प्रमाणे शेतात वेळ काढून शीर्षासन करताना सायखेडा येथील शेतकरी.

ठळक मुद्देसोशल मीडियाचा आधार घेत त्यांनी फेसबुकचा आधार घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : शहरातील महालक्ष्मीनगर येथील योगशिक्षक वसंत गोसावी व जयश्री गोसावी यांनी सहाव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त फेसबुक लाइव्हवरून योग प्रात्यक्षिके सादर केला. कोरोना प्रादुर्भावामुळे प्रत्यक्ष योगवर्ग बंद असल्याने सोशल मीडियाचा आधार घेत त्यांनी फेसबुकचा आधार घेतला.
या योगवर्गाचा सुमारे ६७ जणांनी लाभ घेतल्याचे कळवले आहे. सकाळी सहाला प्रार्थनेने योगवर्गाला प्रारंभ झाला. यावेळी मान, खांदा, कंबर व पायाच्या हालचाली घेण्यात आल्या. यानंतर ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्ध चक्रासन त्रिकोणासन ही उभी राहून करण्याची आसने झाली.
दंडासन, भद्रासन, वज्रासन, अर्ध उष्ट्रासन, उष्ट्रासन, शशांकासन, उत्तान मंडुकासन, वक्रासन ही बैठक स्थितीतील आसने घेण्यात आली. त्यानंतर मकरासन, भुजंगासन, शलभासन ही पोटावर झोपून करण्याची आसने व सेतूबंधासन, उत्तानपादासन, अर्ध हलासन, पवन मुक्तासन, शवासन ही पाठीवर झोपून आसने झाली.
कपालभाती, अनुलोम-विलोम शितली, भ्रामरी व ध्यान प्राणायाम प्रात्यक्षिक सादर केले. प्रत्येक आसन व प्राणायामाच्या कृती, लाभ व काळजी याविषयी मार्गदर्शन केले. शांतीपाठाने योगवर्गाची सांगता झाली. महालक्ष्मीनगर येथे गेल्या तीन वर्षांपासून मोफत योगवर्ग सुरू आहे.

Web Title: Yoga training to Sinnar via Facebook Live

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.