पाटोदा विद्यालयात योग दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 18:57 IST2019-06-21T18:57:12+5:302019-06-21T18:57:43+5:30

पाटोदा : येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या जनता माध्यमिक व उच्य माध्यमिक विद्यालयात पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

 Yoga Day celebrated in Patoda Vidyalaya | पाटोदा विद्यालयात योग दिन साजरा

पाटोदा विद्यालयात योग दिन साजरा

योग दिनानिमित्त जनता विद्यालयाच्या पटांगणावर प्रार्थना, विविध आसने,कपालभारती, नाडीशोधन प्राणायाम, ध्यान व शांतीपाठ घेण्यात आला. या प्रसंगी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांनी आपल्या मनाला संतुलित ठेवण्याचा संकल्प केला.
अभिनव बालविकास मंदिर,माध्यमिक व उच्य माध्यमिक विद्यालयाच्या दोन हजार विद्यार्थ्यांनी व साठ शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्साहात योगासने केली. आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रशिक्षक बाळासाहेब कदम, क्र ीडा शिक्षक के. एम. गाजरे ,एस.व्ही. पाटील यांनी योगासनांची प्रात्यक्षिके करुन दाखविली. प्राचार्य एन. ए. दाभाडे,अभिनव बालविकासचे मुख्याध्यापक ढगे व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते.

Web Title:  Yoga Day celebrated in Patoda Vidyalaya

टॅग्स :Yogaयोग