मटाणे आरोग्य उपकेंद्रात योग शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 00:53 IST2021-02-26T23:38:02+5:302021-02-27T00:53:16+5:30

देवळा तालुक्यातील मटाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांसाठी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Yoga camp at Matane Health Sub-center | मटाणे आरोग्य उपकेंद्रात योग शिबिर

मटाणे आरोग्य उपकेंद्रात योग शिबिर

मेशी : देवळा तालुक्यातील मटाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांसाठी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात योग शिक्षक गौरव परदेशी आणि योग शिक्षिका पूजा परदेशी यांनी योगाचे महत्त्व सांगितले तसेच योगाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. योग शिबिरात असंख्य ग्रामस्थांनी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन लाभ घेतला. याप्रसंगी आरोग्य अधिकारी डाॅ.तिलोत्तमा देवरे यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी आरोग्य सेवक एस.डी.सोनवणे,आरोग्यसेविका एन.ओ. भामरे,आशा सेविका प्रमिला पवार, वंदना पवार, अमोल आहेर आदींसह ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Yoga camp at Matane Health Sub-center