येवल्यात सराईत चोर पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 01:22 IST2021-07-20T23:45:49+5:302021-07-21T01:22:10+5:30

येवला : एटीएम कार्डच्या माध्यमातून पैसे लंपास करणाऱ्या सराईत चोरट्यास शहर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.

In Yeola, a thief was caught by the police | येवल्यात सराईत चोर पोलिसांच्या जाळ्यात

येवल्यात सराईत चोर पोलिसांच्या जाळ्यात

ठळक मुद्देसीसीटीवी फुटेजवरून तपास सुरू होता.

येवला : एटीएम कार्डच्या माध्यमातून पैसे लंपास करणाऱ्या सराईत चोरट्यास शहर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.
शहर परिसरातील एटीएम केंद्रात जाऊन एटीएम धारकांचा अजाणतेपणाचा फायदा घेऊन हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदल करून एटीएममध्ये पैसे काढणाऱ्या सराईत चोराच्या शोधात शहर पोलिस होते. विविध एटीएम केंद्रातील सीसीटीवी फुटेजवरून तपास सुरू होता.

संशयित सनिदेवल विष्णू चव्हाण (२०, रा. मुद्देश वडगाव ता. गंगापूर) हा मंगळवारी, (दि.२०) येवला शहरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शहरात विविध ठिकाणी पोलिसांनी सापळा लावला होता.
गंगादरवाजा भागात सदर संशयित दिसताच पोलिसांनी शिताफीने त्यास अटक केली. त्याच्याकडून विविध बँकाचे आणि ग्राहकांचे एटीएम कार्ड जप्त करण्यात आले असून पुढील तपास चालु आहे.

Web Title: In Yeola, a thief was caught by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.