येवल्यात कांद्याचे बाजारभाव स्थिर
By Admin | Updated: May 10, 2014 23:48 IST2014-05-10T20:07:10+5:302014-05-10T23:48:50+5:30
येवला : येवला व अंदरसूल बाजार समितीत उन्हाळा कांद्याच्या आवकेत घट होऊन बाजारभाव स्थिर असल्याचे चित्र मागील आठवड्यात दिसले. गेल्या सप्ताहात येवला मार्केट यार्डवर एकूण २१०६८ क्विंटल कांदा आवक झाली असून, गावरान कांद्याचे बाजारभाव किमान रु. १५० ते कमाल रु. १५५३ तर सरासरी रु. ७०० प्रतिक्विंटल होते. उपबाजार अंदरसूल येथे कांद्याची एकूण आवक ९९४५ क्विंटल झाली असून, गावरान कांद्याचे बाजारभाव किमान रु. १५० ते कमाल रु. १२०० तर सरासरी रु. ७०० प्रतिक्विंटल होते.

गहू : गव्हाची एकूण आवक ४५ क्विंटल बाजारभाव किमान रु. १४०१ ते कमाल रु. १८५३/- तर सरासरी रु. १५०० प्रतिक्विंटल होते.
बाजरी : बाजरी एकूण आवक ४३ क्विंटल, बाजारभाव किमान रू. १२५० ते कमाल रु. १८०२ तर सरासरी रु. १५७५ पर्यंत होते.
हरभरा : हरभरा आवक १७५ क्विंटल बाजारभाव किमान रु. २४९५ ते कमाल रु. ३०९२ तर सरासरी रु. २७०० पर्यंत होते.
तूर : तूरची आवक केवळ ८ क्विंटल, बाजारभाव किमान रु. ३१५२ ते कमाल रु. ३६५१ तर सरासरी रु. ३४८१ पर्यंत होते.
मका : मक्याची एकूण आवक १८५४ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान रु. १०९२ ते कमाल रु. १२६३ तर सरासरी रु. १२३० पर्यंत होते.