येवल्यात कांदा १००० रु पयांनी घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:09 IST2018-03-10T00:09:08+5:302018-03-10T00:09:08+5:30
येवला : येथील बाजार समतिीच्या येवला व अंदरसूल उपबाजारात शुक्र वारी लाल कांद्याची आवक 20 हजार क्विंटल झाली.

येवल्यात कांदा १००० रु पयांनी घसरला
येवला : येथील बाजार समतिीच्या येवला व अंदरसूल उपबाजारात शुक्र वारी लाल कांद्याची आवक 20 हजार क्विंटल झाली असून गेल्या सहा दिवसात 1000 रु पये प्रतीक्विंटल भाव घसरल्याने शेतकरी आपल्या शेतातील लाल कांद्याला मिळत असलेला भाव पदरात पडून घेण्यासाठी रात्रीचा दिवस करीत आहे. गेल्या आठ दिवसापूर्वी कांद्याला 1700 ते 2000 रु पये प्रतीक्विंटल भाव मिळत होता.लाल कांद्याला भाव तेजीत राहतील असा जाणकारांचा अंदाज होता.शेतकरी आनंदात असतांना अपेक्षेपेक्षा अधिक कांदा बाजारात दाखल होत आहे.त्यामुळे भावात घसरण झाली आहे .आणखी कांद्याचे भाव कमी होतील.चालू असलेला भाव पदरात पडून घ्यावा,या आशेने शेतकरी वेगाने कांदा मार्केटला आणू लागल्याने आवक मोठ्या प्रमाणावर वाढली त्याचा परिणाम भाव कमी होण्यावर झाला.15 नोव्हेंबरला 2017 दरम्यान लाल कांद्याने मार्केटमध्ये प्रवेश केला तरी देखील भाव टिकून होते.मात्र चालू आठवड्यात कांदा घसरणीला लागला आहे.
शुक्र वारी येवला व अंदरसूल बाजार आवारात 600 ट्रँक्टर आण ि400 रिक्षापिकअप मधून सुमारे 20 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली.येवला बाजार आवारात लाल कांद्याला किमान 300 रु पये, कमाल 911 तर सरसरी 800 रु पये प्रतिक्विंटल भाव मिळाला.ही भावातील लक्षणीय घसरण आहे.कमी प्रमाणात आवक असलेल्या उन्हाळ कांद्याला किमान 300 रु पये,कमाल 846 रु पये तर सरसरी 775 रु पये भाव मिळत आहे.