येवला महाविद्यालयाचे सुदृढ भारत अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:21 IST2020-12-05T04:21:09+5:302020-12-05T04:21:09+5:30
येवला : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी कल्याण मंडळ व ...

येवला महाविद्यालयाचे सुदृढ भारत अभियान
येवला : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी कल्याण मंडळ व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुदृढ भारत अभियानांतर्गत प्रभातफेरी काढण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. भाऊसाहेब गमे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सुदृढ राहण्यासाठी क्रीडा, व्यायाम व योगाचे महत्त्व सांगत प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. शरीर तंदुरस्त असेल तर मनही आनंदी व तंदुरुस्त राहाते. त्यामुळे हातून मोठे काम होऊ शकते, असे सांगितले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून येवला शहरात प्रभातफेरी काढण्यात आली. प्रभातफेरीमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपप्राचार्य प्रा. एस.डी. गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. आर.एन. वाकळे, क्रीडा संचालक प्रा. शिरीष नांदुर्डीकर, पर्यवेक्षक प्रा. अरुण वनारसे, प्रा. ठका सखाहरी सांगळे यांनी प्रयत्न केले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी प्रभातफेरीमध्ये सामील झाले होते.
फोटो- ०४ येवला कॉलेज
===Photopath===
041220\04nsk_24_04122020_13.jpg
===Caption===
फोटो- ०४ येवला कॉलेज