येवा कोकण : देशाटनासाठी नाशिककर दिवाळीत गाठणार समुद्रकिनारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 18:22 IST2018-10-27T18:21:41+5:302018-10-27T18:22:55+5:30
पर्यटनाच्या नियोजनामध्ये नागरिकांकडून माथेरान, अंबोली, महाबळेश्वर, पाचगणी, सातारा, पुणे, लोणावळा-खंडाळा, गोवा, कोकण अदि भागांचा समावेश आहे. पर्यटनविकास महामंडळाकडेही आगाऊ नोंदणी बहुतांश नागरिकांनी पुर्ण केली आहे.

येवा कोकण : देशाटनासाठी नाशिककर दिवाळीत गाठणार समुद्रकिनारे
नाशिक : यंदाच्या दिवाळी सुटीच्या हंगामात सालाबादप्रमाणे नाशिककरांनी देशाटनासाठी घराबाहेर पडण्याचे नियोजन केले आहे. यंदा देशांतर्गत पर्यटनाला अधिक पसंती दिली जात असून के रळ वगळता कोकण, गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांसह गड-किल्ल्यांच्या गावांना पसंती दिली जात असल्याचे पर्यटन व्यावसायिकांनी सांगितले.
दिवाळीच्या पार्र्श्वभूमीवर शाळा-महाविद्यालये, कार्यालयांना सुटी असते. तीन ते चार दिवसांचा सण आटोपताच सुटीचा आनंद लुटण्यासाठी नाशिककर घराबाहेर पडण्याच्या बेतात आहेत. पर्यटनाच्या नियोजनामध्ये नागरिकांकडून माथेरान, अंबोली, महाबळेश्वर, पाचगणी, सातारा, पुणे, लोणावळा-खंडाळा, गोवा, कोकण अदि भागांचा समावेश आहे. पर्यटनविकास महामंडळाकडेही आगाऊ नोंदणी बहुतांश नागरिकांनी पुर्ण केली आहे.

येवा कोकण आपलोच आसा...
यंदा दिवाळीच्या हंगामात लकोकणातील तारकर्ली, रत्नागिरी, गणपतीपुळे, गुहागर, हरिहरेश्वर, वेलनेश्वर, दिवे-आगर, आवास, मालवण, रेवदंडा, अलिबाग असे सुमारे बारा ते पंधरा समुद्रकिनारे कोकणाला लाभलेले आहे. तसेच भेरलीमाड, राया, आंबा, सुपारी, केळी, फणस, नारळ,काजू, कोकमसह भातशेती हे कोकणाचे वैशिष्टय मानले जाते. कोकण पर्यटनामध्ये बहुतांश पौराणिक मंदिरांना भेटी देत धार्मिक पर्यटनासह सागरी व नैसर्गिक पर्यटनाचाही आनंद लुटता येतो. याबरोबरच विजयदुर्ग, मुरूड-जंजिरा, महाडजवळील रायगड या किल्ल्यांची भटकंती करत दुर्ग पर्यटनही पूर्ण करता येते.

