शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

पाळे खुर्द येथील अष्टभुजा देवीच्या यात्रेस शनिवारपासून प्रारंभ

By admin | Updated: January 21, 2016 22:10 IST

पाळे खुर्द येथील अष्टभुजा देवीच्या यात्रेस शनिवारपासून प्रारंभ

पाळे खुर्द : येथील जागृत देवस्थान, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या श्री अष्टभुजादेवीचा यात्रोत्सव शनिवारपासून (दि.२३) सुरू होणार असल्याची माहिती यात्रोत्सव समितीचे अध्यक्ष विलास पाटील यांनी दिली. यावेळी उपाध्यक्ष किरण पाटील, सचिव सचिन पाटील व रावसाहेब पाटील, जिभाऊ पाटील उपस्थित होते.शनिवारी सकाळी ७ वाजता मंदिराचे पुजारी ज्योतिर्भास्कर सुनील पाठक यांच्या हस्ते कलश पूजन, ध्वजारोहणानंतर दिवसभर भजन, कीर्तन, महाआरती, होमहवन आदि कार्यक्रम होतील. दुपारी २ वाजता श्री अष्टभुजादेवीच्या रथाची सवाद्य मिरवणूक काढण्यात येईल. रात्री ९ वाजता मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशा होईल. दुसऱ्या दिवशी दि. २४ रोजी कुस्त्यांची दंगल तर दि.२५ रोजी यात्रेची सांगता व भंडारा होईल. ग्रामपंचायतीकडून यात्रोत्सवादरम्यान पथदीप व पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात येणार आहे.येथील श्री अष्टभुजा देवीची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्याची आख्यायिका आहे. सुरतेच्या लुटीनंतर परतीच्या मार्गाने जाताना गिरणा नदीच्या पात्रातून मार्ग काढत महाराज पाताळेश्वर म्हणजे आताचे पाळे खुर्द येथे आले. महाराजांना घनदाट जंगलात आज ज्या ठिकाणी अष्टभुजा देवीचे मंदिर तेथे एक पर्णकुटी दिसली. त्या दिशेने महाराज गेले तेव्हा तेथे एक आदिवासी जोडपे गिरणा नदीच्या तिरावर राहत असल्याचे दिसले. महाराजांनी आदिवासी महिलेला आपली ओळख सांगितली. ती आदिवासी महिला आश्चर्यचकीत झाली व महाराजांना विनंती केली की, आजचा मुक्काम हा आपण सर्वांनी माझ्या पर्णकुटीवर करावा. महाराजांनी विनंती स्वीकारून मुक्काम केला. महाराजांनी आपल्याबरोबर आणलेला शिधा त्या महिलेला दिला. महिलेने महाराजांना पळसवृक्षाच्या पानावर गोलाकार पद्धतीने भात, कढी व त्यावर कढीपत्ता असलेली फांदी शिजवून ठेवलेली होती व बाजूला चटणी होती. त्यावर महाराजांनी महिलेला विचारले हे काय भोजन आहे. त्यावर महिला उत्तरली कढीची पाळ गोलाकार पद्धतीने भात भिजवून मग सेवन करावयाची त्यावर महाराजांना गनिमीकावा संकल्पना सुचली असेच आपण शत्रूच्या किल्ल्याला गोलाकार वेढा मारला तर आपल्या किल्ला सहज जिंकता येईल या कल्पनेने कढीची पाळ. पाळ हा शब्द स्मरणात राहिल्याने मौजे पाताळेश्वर गावाचे नामकरण महाराजांनी पाळे खुर्द केले. दुसऱ्या दिवशी गिरणात स्नान करून पाळे खुर्द येथील आदिवासी जोडप्याच्या पर्णकुटी शेजारी दगडाची एक चिरा उभी केली. आदिवासी जोडप्याला उपस्थितीत आठही दिशा फिरल्यानंतर महाराजांना राजधानी रायगडकडे जाण्याची दिशा मिळाली व त्यांनी श्री अष्टभुजा देवीची स्थापना करुन पौष पौर्णिमेस देवीचा यात्रोत्सव सुरू करण्याची प्रार्थना केली व तसेच येथील जनतेला पीक, धनधान्य येऊ दे व गुण्यागोविंदाने यात्रोत्सव पाळे खुर्द जनतेला साजरा करू दे, अशी प्रार्थना केली व तेव्हापासून हा यात्रोत्सव साजरा केला जातो. (वार्ताहर)