शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

‘विकीपिडीया’ची मॉन्यूमेंट्स स्पर्धा :जागतिक स्तरावर ‘लोकमत’चे प्रशांत खरोटे यांनी फडकविला तिरंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 23:55 IST

या स्पर्धेत भारतातून ७ हजार ७९३ छायाचित्रे प्राप्त झाली होती. यामधून छाननीअंतर्गत ५० छायाचित्रे विकीपिडीयाच्या परीक्षकांच्या समूहाने निवडली व या निवडलेल्या छायाचित्रांमधून ‘टॉप टेन’ यादीमध्ये खरोटे यांच्या सदर छायाचित्राने प्रथम क्रमांक राखला. भारतातून ही टॉप-१० छायाचित्रे आंतरराष्ट्रीय फेरीसाठी पात्र ठरली.

ठळक मुद्देजगभरातील ४५पेक्षा अधिक देशांमधून सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक छायाचित्रे स्पर्धेत खंडोबारायाच्या जेजुरीमधील चंपाषष्ठी उत्सवाचा जागतिक स्तरावर जयजयकार आंतरराष्ट्रीय ‘विकीलव्ह मॉन्यूमेंट्स स्पर्धेत भारताचा तिरंगा फडकला

नाशिक : ‘विकीपिडीया’च्याराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ‘लोकमत’चे वरिष्ठ छायाचित्रकार प्रशांत खरोटे यांनी टिपलेल्या जेजुरीमधील चंपाषष्ठीच्या ‘खंडोबा उत्सव’ छायाचित्राने प्रथम क्रमांक पटकाविला. जगभरातून या स्पर्धेच्या आंतरराष्ट्रीय फेरीमध्ये सुमारे दोन लाख ४६ हजार १०१ छायाचित्रे प्राप्त झाली होती. या सर्व छायाचित्रांमध्ये भारताच्या टॉप टेनमधील अव्वलस्थानी राहिलेले खरोटे यांनी टिपलेल्या छायाचित्राला प्रथम क्रमांक मिळाला असून, आंतरराष्ट्रीय ‘विकीलव्ह मॉन्यूमेंट्स स्पर्धेत भारताचा तिरंगा फडकला.

गेल्या सप्टेंबर महिन्यात विकीपिडीयाच्या वतीने ‘वास्तू’ संकल्पना निश्चित करून ‘विकीलव्ह मॉन्यूमेंट्स स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत भारतातून ७ हजार ७९३ छायाचित्रे प्राप्त झाली होती. यामधून छाननीअंतर्गत ५० छायाचित्रे विकीपिडीयाच्या परीक्षकांच्या समूहाने निवडली व या निवडलेल्या छायाचित्रांमधून ‘टॉप टेन’ यादीमध्ये खरोटे यांच्या सदर छायाचित्राने प्रथम क्रमांक राखला. भारतातून ही टॉप-१० छायाचित्रे आंतरराष्ट्रीय फेरीसाठी पात्र ठरली. या फेरीमध्ये जगभरातील ४५पेक्षा अधिक देशांमधून सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक छायाचित्रे स्पर्धेत होती. या फेरीमध्येही खरोटे यांच्या सदर छायाचित्राने परीक्षकांच्या समूहाचे लक्ष वेधून घेत बाजी मारली. एकूणच खंडोबारायाच्या जेजुरीमधील चंपाषष्ठी उत्सवाचा जागतिक स्तरावर जयजयकार झाला आहे.चंपाषष्ठी उत्सवाचे टिपलेले विजयी छायाचित्र हे तांत्रिकदृष्ट्या कसोटीवर खरे उतरले; मात्र छायाचित्राने सांगितलेला उत्सव व भाविकांचा दिसणारा आनंद परीक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. राष्ट्रीय स्तरावरील टॉप-१०मध्ये प्रथम क्र मांक मिळविल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरही घोडदौड कायम ठेवत प्रथम क्र मांक पटकाविणे ही देशासाठी अभिमानाची बाब असल्याचे विकीपिडीयाचे भारताकडून स्पर्धेचे संयोजन करणारे प्रमुख संयोजक सुयश द्विवेदी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.राष्ट्रीय पातळीवर परीक्षकांच्या समूहात विकीपिडीयाचे सुयश द्विवेदी, स्वप्नील करंबळेकर, श्रेया द्विवेदी, भारतीय पुरातत्व विभागाचे मध्य प्रदेशचे सहायक संचालक यादव, नेहरू सायन्स सेंटरचे सेवानिवृत्त अधिकारी व्ही. व्ही. रायगावकर यांचा समावेश होता.सहा वर्षांनंतर पुन्हा भारताची बाजीविकीपिडीयाच्या वतीने दरवर्षी सदर स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेतून टॉप-१० छायाचित्रे आंतरराष्ट्रीय फेरीसाठी दरवर्षी पात्र ठरतात. यापूर्वी २०१२ मध्ये आंतरराष्ट्रीय फेरीत भारताकडून पाठविलेल्या दहा छायाचित्रांपैकी एका छायाचित्राने प्रथम क्रमांक राखला होता तर दुसरे छायाचित्र टॉप-१०मध्ये राहिले होते. त्यानंतर सहा वर्षांनी यंदा २०१७च्या स्पर्धेत पाठविलेल्या टॉप-१०मधील छायाचित्रांमध्ये खरोटे यांचे एकमेव छायाचित्र विजयी ठरले.संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब खरोटे यांचे छायाचित्रराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक कसोटीमध्ये खरे उतरले आहे. त्यांनी अत्यंत चपखलपणे अचूक क्षणी पुण्यामधील जेजुरीचा खंडोबारायांचा उत्सव टिपला. तांत्रिकदृष्ट्या हे छायाचित्र सर्वोत्कृष्ट तर आहेच; मात्र उत्सवाचा आनंद, वास्तूचे सौंदर्य, रंगसंगती आणि हर्षोल्हास अशी एक कथादेखील छायाचित्र सहज सांगून जाते. त्यामुळे हे छायाचित्र आंतरराष्ट्रीय पातळीवरही विजयी ठरले. संपूर्ण देशासाठी व विकीपिडीयाच्या भारतीय समूहासाठी ही अभिमानाची बाब आहे.- सुयश द्विवेदी, प्रमुख संयोजक विकीपिडीया, भारत

 

टॅग्स :NashikनाशिकKhandoba Yatraखंडोबा यात्राPuneपुणेTempleमंदिरIndiaभारत