विद्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतिक योग दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 00:14 IST2021-06-21T22:28:48+5:302021-06-22T00:14:29+5:30
येवला : विद्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

विद्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतिक योग दिन
येवला : विद्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कोरोना महामारीमुळे सर्वत्र शाळा ऑनलाईन चालु असल्या तरीही गेल्या वर्षभरापासून योगा हा उपक्रम विद्या इंटरनॅशनल स्कूलने सुरू ठेवला आहे. यात विद्यार्थ्यांचाही सक्रिय सहभाग राहिला आहे. जागतिक योग दिनानिमित्त शाळेचे क्रीडाशिक्षक किरण कुलकर्णी आणि मोईज दिलावर यांनी मायक्रोसॉफ्ट या अधिकृत अँप्लिकेशन वर सुमारे २७३ विद्यार्थ्यांच्या उपस्थित योगाचे प्रात्यक्षित साजरे केले.
विद्यार्थी वर्गाचा या उपक्रमास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी प्राचार्य शुभांगी शिंदे, संस्थेचे संस्थापक डॉ. राजेश पटेल, डॉ. संगीता पटेल तसेच सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी सहभागी झाले होते.