शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये साडेसहा हजार कोटींची कामे; मुख्यमंत्र्यांनी तयारीचा घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 11:38 IST

सर्व निर्धारित कामे लवकरात लवकर मार्गी लावली जाणार

लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक: त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या निमित्ताने ४ हजार कोटींच्या विकासकामांच्या निविदा काढल्या असून, २.५ हजार कोटींची कामे लवकरच मार्गी लावली जाणार असून, एकूण साडेसहा हजार कोटींची विकासकामे होणार आहेत. सर्व निर्धारित कामे लवकरात लवकर मार्गी लावली जाणार असल्याचे मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कुंभमेळा सुरक्षित, गोदावरी निर्मळ आणि पवित्र वातावरणात होण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. त्यासाठी निधीची उपलब्धता करून देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.

कुंभमेळ्याबाबत साधू महंतांचा अनुभव मोठा आहे, त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. गत कुंभमेळ्यावेळी तयारीसाठी कालावधी कमी होता. यावेळी पूर्वतयारीसाठी अधिक कालावधी असल्याने शासन चांगली तयारी करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथेदेखील उत्तम सुविधा उभारण्यात येतील. त्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

'कॉमन मॅन- पोलिस शिल्पा'चे अनावरण

  • दिवसभर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम, उद्घाटने पार पडली. त्यात चित्पावन ब्राह्मण संघ, नाशिक यांच्या हस्ते श्री परशुराम भवन या नूतन वास्तूचे लोकार्पण, पोलिस उपायुक्त कार्यालय,  'कॉमन मॅन- पोलिस शिल्पा'चे अनावरण करण्यात आले. 
  • महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण तथा संशोधन अकादमीतर्फे आयोजित मुख्यमंत्री सहायता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातील प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप झाला.

४ हजार कोटींच्या निविदा प्रसिद्ध

  • सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीच्या साडेसहा हजार कोटींच्या कामांपैकी ४ हजार कोटींपेक्षा अधिक कामाच्या निविदा 
  • प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तर लवकरच २ हजार ६०० कोटींच्या निविदा काढण्यात येणार आहेत.
  • मात्र, त्यातील अनेक कामे अद्याप कागदावरच असून प्रत्यक्षात साकार होण्यास २०२७ मधील जानेवारी महिन्याची डेडलाईन निश्चित करण्यात आली आहे.
टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाNashikनाशिकChief Ministerमुख्यमंत्रीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस