कादवा नदीत पाय घसरून कामगाराचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 01:34 IST2020-10-24T23:22:49+5:302020-10-25T01:34:49+5:30

निफाड : अंघोळ व कपडे धुण्यासाठी कादवा नदीत गेलेल्या कामगाराचा पाय घसरून पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला.

Worker drowns in mud river | कादवा नदीत पाय घसरून कामगाराचा बुडून मृत्यू

कादवा नदीत पाय घसरून कामगाराचा बुडून मृत्यू

ठळक मुद्देकादवा नदीपात्रात कपडे धुण्यासाठी व आंघोळ करण्यासाठी गेला होता.

निफाड : अंघोळ व कपडे धुण्यासाठी कादवा नदीत गेलेल्या कामगाराचा पाय घसरून पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला. निफाड येथील निवृत्तीनगर परिसरात राहणारा रामजनम रामकरण गौतम (२१) हा मजूर शुक्रवारी (दि.२३) सकाळी १० च्या सुमारास कादवा नदीपात्रात कपडे धुण्यासाठी व आंघोळ करण्यासाठी गेला होता. यावेळी तो पाय घसरून नदीत पडला, त्यानंतर तो नदीत बुडू लागला. त्याच्यासोबत असणाऱ्या मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला; पण तो असफल ठरला. तो पाण्यात बुडून मरण पावला. त्यानंतर गौतम याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण केले. या पथकाने गौतम याचा नदीपात्रात शोध घेण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी रात्र झाल्याने सदर शोधकार्य थांबविण्यात आले. अखेर शनिवारी (दि. २४) सकाळी ९ च्या सुमारास पथकाने पुन्हा शोधमोहीम हाती घेतल्यानंतर गौतम याचा मृतदेह नदीपात्रात सापडला. मृत रामजनम गौतम हा मूळचा उत्तर प्रदेशातील असून, निफाड येथे तो मजुरी करायचा. गौतम याच्या मृतदेहाची निफाड उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार शिवाजी माळी, पोलीस कॉन्स्टेबल तुषार सोनवणे, पोलीस नाईक त्र्यंबक पारधी हे करीत आहेत.

Web Title: Worker drowns in mud river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.