टाकीत श्वास गुदमरून कामगाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 01:15 IST2020-08-29T23:27:35+5:302020-08-30T01:15:08+5:30
नाशिक : अंबड येथील औद्योगिक वसाहतीत असलेली टाकी स्वच्छ करताना रासायनिक दुर्गंधीमुळे गुदमरून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे

टाकीत श्वास गुदमरून कामगाराचा मृत्यू
ठळक मुद्देश्वसनाचा त्रास होऊन ते मृत्युमुखी पडल्याचे पोलिसांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : अंबड येथील औद्योगिक वसाहतीत असलेली टाकी स्वच्छ करताना रासायनिक दुर्गंधीमुळे गुदमरून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे
कारखान्यातील टाकी स्वच्छ करण्यासाठी मुंजाभाऊ साहेबराव वंजारे (४०, रा. पांडवनगरी, इंदिरानगर) हे टाकीमध्ये उतरले होते. यावेळी त्यांना श्वसनाचा त्रास होऊन ते मृत्युमुखी पडल्याचे पोलिसांनी सांगितले.
टाकीतील विषारी वायुमुळे त्यांना त्रास झाला. हा प्रकार लक्षात येताच तातडीने वंजारे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.