मुसळगाव वसाहतीत विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 14:25 IST2020-09-30T14:25:50+5:302020-09-30T14:25:50+5:30
सिन्नर: येथील मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील त्र्यंबक रबर कारखान्यात विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना रात्री उशिरा घडली. याबाबत एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे. प्रभूकांत चौधरी (55, माउली मळा, मुसळगाव) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.

मुसळगाव वसाहतीत विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू
ठळक मुद्देप्रभुकांत चौधरी हा विजेच्या धक्क्याने बेशुद्ध पडला.
सिन्नर: येथील मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील त्र्यंबक रबर कारखान्यात विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना रात्री उशिरा घडली. याबाबत एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे. प्रभूकांत चौधरी (55, माउली मळा, मुसळगाव) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. कंपनीत काम करत असताना प्रभुकांत चौधरी हा विजेच्या धक्क्याने बेशुद्ध पडला. त्यास उपचारासाठी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. कारखान्याचे अधिकारी हेमंत सोने यांनी ही माहिती पोलिसांना दिली