येवला तालुक्यात खडीच्या ढिगाखाली दबून कामगाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2022 01:36 IST2022-05-30T01:36:03+5:302022-05-30T01:36:23+5:30

येवला तालुक्यातील वाईबाेथी येथे खडीच्या ढिगाखाली दबून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे.

Worker dies after being crushed under a rock in Yeola taluka | येवला तालुक्यात खडीच्या ढिगाखाली दबून कामगाराचा मृत्यू

येवला तालुक्यात खडीच्या ढिगाखाली दबून कामगाराचा मृत्यू

येवला : तालुक्यातील वाईबाेथी येथे खडीच्या ढिगाखाली दबून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे.

तालुका पाेलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील वाईबोथी शिवारात खडी क्रशरवर काम करणारा कामगार भागवत गवळी (२५) यांचा खडीखाली दबून मृत्यू झाला. रविवारी (दि. २९) सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. मृत भागवत गवळी हे बीड जिल्ह्यातील हाेते. चार जेसीबी व पॉकलॅनच्या साहाय्याने बारीक खडी बाजूला करून व गॅस कटरने लोखंडी चॅनल कापून त्यांना बाहेर काढण्यात आले. या दरम्यान गवळी यांचा मृत्यू झाला होता.

सदर घटनेचा तपास येवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे हे करीत आहेत.

 

Web Title: Worker dies after being crushed under a rock in Yeola taluka