शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
4
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
5
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
6
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
7
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
8
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
9
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
10
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
12
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
13
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
14
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
15
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
16
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
17
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
18
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
19
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
20
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाच्या नियमानुसारच वनौषधी उद्यानाचे काम

By admin | Updated: September 30, 2016 02:13 IST

वनविभागाच्या नियमानुसारच वनौषधी उद्यानाचे काम

वनमंत्री : काम पूर्णत्वाचे दिले आदेशनाशिक : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक असलेल्या नेहरू वनोद्यानातील वनौषधी उद्यानाचे काम वनविभागाच्या कोणत्याही नियमाला बाधा न पोहोचता करण्याचे आणि काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईत आयोजित बैठकीत दिले. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीला मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण, वनविभागाचे सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वन संरक्षक वनबल प्रमुख सर्जन भगत यांच्यासह नाशिक वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते. नाशिक शहरापासून ८ किलोमीटर अंतरावर पांडवलेणीलगत असलेल्या नेहरू वनोद्यानात ९३ हेक्टर क्षेत्रात वनौषधी उद्यान साकारण्याचे काम सुरू आहे. राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून सदर उद्यान साकारले जात असून, टाटा ट्रस्टमार्फत सदर काम केले जाणार आहे. सदर क्षेत्र हे वनविकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. वनोद्यान संलग्न परिसराचा विकास महापालिकेच्या साहाय्याने करण्यात येणार असून, त्यासाठी वनविकास महामंडळ आणि महापालिका यांच्यात सामंजस्य करारही झालेला आहे. दरम्यान, टाटा ट्रस्टमार्फत काम करताना वनविभागाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी वनमंत्रालयाकडे गेल्या होत्या. त्यानुसार, बैठक होऊन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वनविभागाच्या नियमांना बाधा न पोहोचता सदर काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)