पाण्यासाठी महिलांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 12:36 AM2020-07-16T00:36:38+5:302020-07-16T00:37:13+5:30

पिंपळगाव नजीक गावात गेल्या १५ ते २० दिवसांपासून पाणी न आल्याने संतप्त झालेल्या महिलांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा नेत पदाधिकाऱ्यांसह प्रशासनाला जाब विचारला.

Women's march for water | पाण्यासाठी महिलांचा मोर्चा

पिंपळगाव नजीक येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर महिलांनी काढलेला मोर्चा.

Next

लासलगाव : पिंपळगाव नजीक गावात गेल्या १५ ते २० दिवसांपासून पाणी न आल्याने संतप्त झालेल्या महिलांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा नेत पदाधिकाऱ्यांसह प्रशासनाला जाब विचारला.
त्यामुळे पिंपळगाव नजीक येथे पंधरा ते वीस दिवसांपासून पाणी पुरवठा न झाल्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी थेट ग्रामपंचायतीवर येऊन हल्लाबोल केला. लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा यावेळी संतप्त महिलांनी दिला.
लासलगावसह १६ गाव पाणीपुरवठा योजनेचा वारंवार विद्युत पुरवठा बंद-चालू होत असल्याने पाण्याची मोटर खराब होते तर कधी पाईपलाईन वारंवार फुटण्याचे प्रकार घडत असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे महिलावर्गाला मोठा त्रास सहन करावा लागतो.

Web Title: Women's march for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.