Women's Day celebrated at Mhaskhadak | म्हैसखडक येथे महिला दिन साजरा

म्हैसखडक येथे महिलादिनी परिसरातील उपस्थित महिला.

ठळक मुद्देसुरगाणा : तालुक्यातील मांदा व म्हैसखडक येथे नेहरु युवा केंद्र नाशिक यांच्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

सुरगाणा : तालुक्यातील मांदा व म्हैसखडक येथे नेहरु युवा केंद्र नाशिक यांच्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

म्हैसखडक येथे माणदेशी फाउंडेशनच्या फिल्ड ऑफिसर सुनंदा भुसारे यांनी महिलांसाठी शासकीय योजनेची माहिती दिली व घरगुती मिरची, करवंदाचे लोणचं कसे तयार करावे ह्या विषयी मार्गदर्शन केले. तसेच पेठ पंचायत समितीचे उपसभापती महेश टोपले यांनी देखील मार्गदर्शन केले.
युवा कार्यक्रम खेल मंत्रालय भारत सरकार नाशिक जिल्हा समन्वयक कमल त्रिपाठी, सुनिल पंजे, दिलीप आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सुनंदा भुसारे यांनी बचत गटाच्या १५२ महिलांना प्रत्येकी १ किलो मशरूमची बियाणे मोफत वाटप केले. यावेळी प्रेमराज पवार, जितेंद्र गायकवाड, अनिता कामडी, सावित्री, दुर्गा गायकवाड, योगेश गायकवाड, रमेश बोरसे आदी उपस्थित होते.
 

Web Title: Women's Day celebrated at Mhaskhadak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.