महिला, युवावर्गाचा उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 01:42 AM2019-10-22T01:42:17+5:302019-10-22T01:42:52+5:30

Maharashtra Assembly Election 2019 जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघांसाठी सायंकाळपर्यंत सरासरी ६०.१३ टक्के इतके मतदान झाले असून, निफाड मतदारसंघात सर्वाधिक, तर नाशिक पूर्व मतदारसंघात सर्वात कमी मतदानाची नोंद झाली आहे. सकाळी संथगतीने मतदान सुरू असताना सायंकाळी मात्र अनेक केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याने जिल्ह्यातील १७ केंद्रांवर रात्री ९ वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती.

 Women, youth enthusiasm | महिला, युवावर्गाचा उत्साह

महिला, युवावर्गाचा उत्साह

Next

नाशिक : जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघांसाठी सायंकाळपर्यंत सरासरी ६०.१३ टक्के इतके मतदान झाले असून, निफाड मतदारसंघात सर्वाधिक, तर नाशिक पूर्व मतदारसंघात सर्वात कमी मतदानाची नोंद झाली आहे. सकाळी संथगतीने मतदान सुरू असताना सायंकाळी मात्र अनेक केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याने जिल्ह्यातील १७ केंद्रांवर रात्री ९ वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती. सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर मतदान यंत्रांच्या जवळपास २४२ तक्रारी आल्याने ही यंत्रे तातडीने बदलण्यात आली. जिल्ह्यात युवावर्गासह महिलांचा उत्साह दिसून आला.
जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघांसाठी ४५७९ केंद्रांवर सोमवारी सकाळी ७ वाजता मतदानप्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळच्या सुमारास सुरू झालेली पावसाची रिमझिम आणि वातावरणातील गारवा यामुळे सकाळी मतदार घराबाहेर पडले नाहीत. दुपारी ११ वाजेनंतर मतदान केंद्रांवरील गर्दी वाढत गेली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत कळवण मतदारसंघात सर्वाधिक ७६.३५ टक्के, तर नाशिक मध्य मतदारसंघात अवघे ४०.६६ इतक्या मतदानाची नोंद झाली. १७ ठिकाणी रात्री ९ वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे मतदानाची टक्केवारी ३ ते तीन टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
सकाळच्या पहिल्या काही तासातच अनेक ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्यामुळे अशा ठिकाणी तत्काळ यंत्रे बदलण्यात आल्याने कुठेही मतदानाला अडथळा निर्माण झाला नसल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. जवळपास सर्वच मतदारसंघांतून यंत्र बिघाडाच्या घटना समोर आल्या आहेत. ३६ बॅलेट युनिट, ३३ कंट्रोल युनिट आणि १७३ व्हीव्हीपॅट यंत्रांमध्ये बिघाड झाल्याने ही यंत्रे बदलण्यात आली.
इगतपुरी मतदारसंघातील एक मतदान केंद्र २५० मीटर दूरवर गेल्याने तेथील गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. मात्र अधिकाऱ्यांनी वेळीच गावकºयांची समजूत काढल्याने मतदान सुरळीत सुरू झाले.
वॉररूमची २५६
केंद्रांवर टेहाळणी
पंधरा विधानसभा मतदारसंघांसाठी असलेल्या ४,५७९ मतदान केंद्रांपैकी जवळपास ४५६ संवेदनशील केंद्रांवर लाइव्ह वेबकास्टिंगच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात आले होते. या केंद्राच्या टेहळणीतून संशयास्प्द हालचाली प्रकरणी सात जणांवर कारवाई करण्यात आली. वॉररूमच्या माध्यमातून मतदान केंद्रांवरील मतदान कक्ष, वाहनांचे ट्रेकिंग, मतदारांकडून येणाºया तक्रारी आणि आकडेवारीचे संकलन असे चार टप्प्यांत कामकाज करण्यात आले.

Web Title:  Women, youth enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.