महिलांनी स्वच्छंदी जीवन जगावे : किशोर पाठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 01:02 IST2018-08-20T01:01:47+5:302018-08-20T01:02:25+5:30

रोजच्या कामाचा ताणतणाव आणि भावनिक गोष्टींचा कल्लोळ, खांद्यावरच्या वाढत चाललेल्या जबाबदाऱ्या आणि डोळ्यातली महत्त्वाकांक्षी स्वप्ने या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ घालताना महिला स्वत:ला विसरून जातात. परंतु, अशा परिस्थितीतही स्वत:ची स्वप्ने उराशी बाळगून ती पूर्णत्वास नेण्यासाठी प्रवाही होऊन महिलांनी स्वच्छंदी जीवन जगले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी किशोर पाठक यांनी केले.

Women should lead a free life: Kishore Pathak | महिलांनी स्वच्छंदी जीवन जगावे : किशोर पाठक

महिलांनी स्वच्छंदी जीवन जगावे : किशोर पाठक

नाशिक : रोजच्या कामाचा ताणतणाव आणि भावनिक गोष्टींचा कल्लोळ, खांद्यावरच्या वाढत चाललेल्या जबाबदाऱ्या आणि डोळ्यातली महत्त्वाकांक्षी स्वप्ने या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ घालताना महिला स्वत:ला विसरून जातात. परंतु, अशा परिस्थितीतही स्वत:ची स्वप्ने उराशी बाळगून ती पूर्णत्वास नेण्यासाठी प्रवाही होऊन महिलांनी स्वच्छंदी जीवन जगले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी किशोर पाठक यांनी केले.
शरणपूररोड परिसरातील ज्योतिकलश सभागृहात विविध क्षेत्रात कार्यरत ‘ठेवा संस्कृतीचा’ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपतर्फे दुसºया वर्धापन दिनानिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील मजले चिचोलीच्या सरपंच गीतांजली आव्हाड यांना राजकीय व सामाजिक क्षेत्रात व रेखा केतकर यांना अभिनय क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी ‘प्रतिभावंत पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे सदानंद जोशी, अभिनेत्री पल्लवी पटवर्धन, गीतांजली आव्हाड उपस्थित होते.
किशोर पाठक म्हणाले, आयुष्यात सुख आणि आनंद मिळवायचा असेल तर ते उपभोगायलाही शिकले पाहिजे, आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण अनमोल आहे, तो मनसोक्त जगता आला पाहिजे. टोचणाºया, बोचणाºया क्षणिक भावनिक गोष्टींचा लगेच विसर पडून वर्तमान क्षणातला आनंद उपभोगता आला पाहिजे, असे मत किशोर पाठक यांनी व्यक्त के ले. यावेळी गायत्री बळगे, वैशाली साठे, सायली सप्रे, त्रिवेणी गोमासे, मनाली गर्गे, वैशाली घोडके, वैशाली शुक्ल आदी ठेवा संस्कृतीचे सदस्य उपस्थित होते.

Web Title: Women should lead a free life: Kishore Pathak