महिलांनी चिखल तुडवून केला ग्रामपंचायतीचा निषेध
By Admin | Updated: July 28, 2015 00:47 IST2015-07-28T00:43:36+5:302015-07-28T00:47:06+5:30
महिलांनी चिखल तुडवून केला ग्रामपंचायतीचा निषेध

महिलांनी चिखल तुडवून केला ग्रामपंचायतीचा निषेध
सटाणा : ग्रामपंचायत सदस्यांकडून विकास कामे करताना आमच्या भागावर अन्याय केला जातो. रस्ते नसल्यामुळे संपूर्ण परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरल्याने रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याने शहरालगतच्या रामनगर, शरदनगर परिसरातील संतप्त महिलांनी सोमवारी दुपारी चिखल तुडवून ग्रामपंचायत प्रशासनाचा तीव्र निषेध केला.
सटाणा शहरालगत असलेल्या भाक्षी ग्रामपंचायतीच्या रामनगर,शरद नगर या नववसाहती गेल्या पंचवीस वर्षांपासून ग्रामपंचायतीला लाखो रु पयांचा महसूल देतात मात्र महसूल भरूनही या भागात मुलभूत सुविधांचा वानवा आहे.रस्ते ,गटारी नसल्यामुळे ठिकठिकाणी सांडपाण्याचे खड्डे साचले आहेत त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे .परिसरात रस्ते नसल्यामुळे संपूर्ण नागरी वसाहतच चिखलात रु तले आहे.
यावेळी संतप्त महिलांनी ग्रामपंचायत सदस्यांच्या निवासस्थाना जवळ जावून मुलभूत सुविधा का पुरविल्या जात नाही असा जाब विचारल्याने एकच गोंधळ उडाला खरा परंतु त्या सदस्यांकडून कुढल्याही प्रकारचे ठोस आश्वासन न मिळाल्याने संतप्त महिलांनी चिखल तुडवून ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध केला. या आंदोलनात दत्ता शेवाळे,संजय शिंदे, सुरेश गरु डकर, मनीषा बागडणे, शोभा शेवाळे, रत्नागोसावी,शितल शिंदे, विनता शिंदे, पुष्पा गायके, अरु णा मराठे यांच्यासह तीस ते पस्तीस महिला सहभागी झाल्या होत्या.
(वार्ताहर)