कारच्या धडकेत महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 00:10 IST2020-02-19T23:53:23+5:302020-02-20T00:10:37+5:30
नांदगाव : मुखेड-नांदगाव रस्त्यावरील हॉटेल जय मल्हारजवळ इर्टिका कार व पॅशन प्रो दुचाकी यांच्यात समोरा-समोर धडक होऊन झालेल्या अपघातात ...

कारच्या धडकेत महिला ठार
नांदगाव : मुखेड-नांदगाव रस्त्यावरील हॉटेल जय मल्हारजवळ इर्टिका कार व पॅशन प्रो दुचाकी यांच्यात समोरा-समोर धडक होऊन झालेल्या अपघातात महिला ठार झाली.
धडक एवढी भयानक होती की मोटरसायकल पंधरा फूट उंच उडाली. या अपघातात मोटारसायकलवरील पुंजाराम रोकडे गंभीर जखमी झाले तर मागे बसलेल्या त्यांची आई लहानूबाई रोकडे या जागीच ठार झाल्या. अचानक समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या इर्टिका कारने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. पुंजाराम रोकडे हे आई लहानूबाई रोकडे हे वर्षश्राद्ध कार्यक्र मासाठी चास नळी येथे जात होते. घराजवळून एक ते दोन मिनिटाच्या अंतरावर मोटरसायकल व इर्टिका कारची समोरासमोर धडक झाली. कार रस्त्यालगत असलेल्या नालीत उलटली. मोटरसायकल पंधरा फूट उंच उडाल्याने गाडीचा चुराडा झाला. यात लहानूबाई रोकडे जागीच ठार झाल्या, तर पुंजाराम रोकडे गंभीररीत्या जखमी झाले. त्यांचा एक पाय पूर्ण निकामी झाला, तर हात व डोक्याला गंभीर मार लागला. मांजरगाव येथील कारचालक सांगळे व दौंड किरकोळ जखमी झाले. कारचे पुढील बाजूचे मोठे नुकसान झाले. जखमी पुंजाराम रोकडे यांना मुखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल भवारी करीत आहेत.