सिन्नर बसस्थानकातून महिलेची पोत लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 18:34 IST2019-07-20T18:33:43+5:302019-07-20T18:34:51+5:30
सिन्नर येथील बसस्थानक परिसरातून एका महिलेची सव्वा तोळ्याची सोन्याची पोत लांबविल्याची घटना शुक्रवारी घडली.

सिन्नर बसस्थानकातून महिलेची पोत लांबविली
सिन्नर : येथील बसस्थानक परिसरातून एका महिलेची सव्वा तोळ्याची सोन्याची पोत लांबविल्याची घटना शुक्रवारी घडली. चोरांच्या भीतीने पिशवीत ठेवलेली सव्वा तोळ्याची सोन्याची पोत चोरट्यांनी लांबविली. तालुक्यातील ठाणगाव येथील किसनाबाई शिवराम भोर (६५) या सिन्नर-रामनगर बसमध्ये चढत असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या पिशवीतून ही पोत लांबविली. भोर या रामनगर बसमध्ये चढल्यानंतर संगमनेर नाक्यावर त्यांना हातातील पिशवीची चेन उघडी असल्याचे आले. त्यामुळे त्यांनी पिशवीत हात घालून पाहिले असता त्यात पोत नसल्याचे लक्षात आले.
सोनसाखळी लांबविणाऱ्या महिलांची टोळी बसस्थानक परिसरात सक्रि य असून, पोलिसांनी त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.