महिलेचा साडीचा पदर गिरणीत अडकून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 21:54 IST2021-11-23T21:54:50+5:302021-11-23T21:54:50+5:30
चांदवड -तालुक्यातील निंबाळे येथील मंगला भगवान दरेकर (४८) या महिलेच्या साडीचा पदर गिरणीच्या पट्ट्यामध्ये अडकून तिचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. २३) दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास घडली.

महिलेचा साडीचा पदर गिरणीत अडकून मृत्यू
चांदवड -तालुक्यातील निंबाळे येथील मंगला भगवान दरेकर (४८) या महिलेच्या साडीचा पदर गिरणीच्या पट्ट्यामध्ये अडकून तिचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. २३) दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास घडली.
मंगला दरेकर या स्वत:च्या पिठाच्या गिरणीत दळण दळत असताना त्यांच्या साडीचा पदर नकळतपणे गिरणीच्या पट्ट्यामध्ये अडकला व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची खबर सरपंच नंदू चौधरी यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिली. चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर सदर महिलेचा मृतदेह नातलगांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी चांदवड पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अशोक पवार हे अधिक तपास करीत आहेत.