महिलेची चार तोळ्याची पोत लांबवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 01:20 IST2021-03-08T01:20:07+5:302021-03-08T01:20:53+5:30
ठक्कर बाजार बस स्टँडवर बसमध्ये चढणाऱ्या महिलेची चार तोळ्याची सोन्याची पोत व ६ हजार रुपयांची रोकड असलेली पर्स अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली.

महिलेची चार तोळ्याची पोत लांबवली
नाशिक : ठक्कर बाजार बस स्टँडवर बसमध्ये चढणाऱ्या महिलेची चार तोळ्याची सोन्याची पोत व ६ हजार रुपयांची रोकड असलेली पर्स अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली.
अमळनेर येथील वैशाली संजय सोनार यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वैशाली सोनार शनिवारी (दि. ६) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ठक्कर बस स्टॅँड येथे चोपडाकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत होत्या. यावेळी गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्याने पर्स चोरून नेली. ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाणे गाठले.