अंगावर विद्युत वाहिनी पडून महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 01:27 IST2019-02-15T01:27:30+5:302019-02-15T01:27:46+5:30

शेवगेदारणा येथील गव्हाच्या पिकास पाणी देत असलेल्या शेतकरी कुटुंबातील ५२ वर्षीय महिलेच्या अंगावर लघु दाबाची वीजवाहक तार पडल्याने विजेच्या धक्क्याने त्या जागीच ठार झाल्याची घटना घडली.

The woman was killed by electric power channel | अंगावर विद्युत वाहिनी पडून महिला ठार

अंगावर विद्युत वाहिनी पडून महिला ठार

ठळक मुद्देशेवगेदारणा : ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप

देवळाली कॅम्प : तालुक्यातील शेवगेदारणा येथील गव्हाच्या पिकास पाणी देत असलेल्या शेतकरी कुटुंबातील ५२ वर्षीय महिलेच्या अंगावर लघु दाबाची वीजवाहक तार पडल्याने विजेच्या धक्क्याने त्या जागीच ठार झाल्याची घटना घडली.
गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास हौसाबाई सुरेश कासार या त्यांच्या शेतीतील गव्हाच्या पिकास पाणी देत होत्या. त्यावेळी महावितरणची लघु दाबाची वीजवाहक तार खांबावरून तुटून त्यांच्या अंगावर पडली. वीजप्रवाह सुरू असल्याने त्यांना विजेचा तीव्र धक्का बसून, त्या जमिनीवर कोसळल्या. ही घटना ज्ञानेश्वर दशरथ कासार यांनी बघितली. त्यांनी त्वरित धाव घेऊन जवळच्या डीपीवरून वीजपुरवठा खंडित केला. घटनेची माहिती त्वरित नाशिकरोड येथील महावितरण कार्यालयास व पोलीस ठाण्यास कळविण्यात आली.

Web Title: The woman was killed by electric power channel