महिलेची छेड काढल्याच्या कारणावरून इसमाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 07:31 PM2019-10-30T19:31:45+5:302019-10-30T19:32:12+5:30

संशयित आरोपी गोपाळ शेखर कुमावत, लखन शेखर कुमावत, शेखर बंडू कुमावत व शुभम शेखर कुमावत यांचेसह काही साथीदारांनी रमेश यास बेदम मारहाण केली.

The woman was beaten for the reason she was molested | महिलेची छेड काढल्याच्या कारणावरून इसमाचा खून

महिलेची छेड काढल्याच्या कारणावरून इसमाचा खून

Next
ठळक मुद्देसंशयितांकडून पंख्याला गळफास घेतल्याचा बनाव

सिडको : अंबड येथील आशिर्वादनगर परिसरात चार ते पाच जणांनी एका इसमाचा मारहाण करून खून केल्याचा प्रकार घडला. दरम्यान महिलेची छेड काढल्याच्या कारणावरून मारहाण करीत हा खून केल्याचे पोलीसांनी सांगितले. या प्रकरणी अंबड पोलीसांनी संशयित गोपाळ कुमावत यास ताब्यात घेतले असून त्याच्यासह त्यांच्या साथीदारांवर खुनाचा गुन्हा दाखल आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, रमेश दगा वानखेडे (41, रा. पांडुरंग कृष्णा रोहाऊस, आशिर्वादनगर, अंबड) येथे राहतात. सोमवारी (दि. 28) रोजी रात्री रमेश याने एका महिलेची छेड काढल्याच्या संशयावरून त्याचा काहीजणांशी वाद झाला होता. हाच राग धरून दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि. 29) रोजी सकाळी यातील संशयित आरोपी गोपाळ शेखर कुमावत, लखन शेखर कुमावत, शेखर बंडू कुमावत व शुभम शेखर कुमावत यांचेसह काही साथीदारांनी रमेश यास बेदम मारहाण केली. या मारहाणीत रमेश यास गंभीर दुखापत होवून तो जखमी झाला होता. यावेळी परिसरातील नागरिकांनी रमेश याची मारहाण करणाऱ्यांकडून सुटका केली व त्याला घरात ठेवले. यावेळी रमेश याने घरात गळफास घेतला असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्यानंतर नागरिकांनीच त्याला एमएच-15- डीएस-5302 या चारचाकी गाडीतून जिल्हा रूग्णालयात दाखल केले. यावेळी रुग्णालयात शवविच्छेदन केले असता रमेश याचा मृत्यू गळा आवळून नाही तर गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान मंगळवारी दरवर्षीप्रमाणे रमेश आणि त्याचा भाऊ अमृत हे दोघेजण संगमेश्वर येथे बहिणीकडे भाऊबीजेसाठी जाणार होते. भावाने रमेश यास फोन केला असता त्याने फोन न उचलल्याने अमृत हा थेट बहिणीकडे जाण्या निघाला मात्र रस्त्यात भाऊ सिरीअस असल्याचा फोन आल्याने तो पुन्हा जिल्हा रुग्णालयात गेला. त्यावेळी त्याला समजले की, सोमवारी (दि. 28) रोजी रात्री काही जणांनी रमेश यास मारहाण करून जखमी केल्याचे समजले. त्यानंतर अमृत याने याबाबतची माहिती अंबड पोलीसांना दिल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. यानंतर अमृत यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मिथुन म्हात्रे करीत आहेत.

संशयितांकडून बनाव
दरम्यान रमेश वानखेडे यास संशयित गोपाळ कुमावत व त्याच्यासह चार ते पाच जणांना बेदम मारहाण करून त्यास त्याचा घरात नेऊन घरातील पंख्याला गळफास घेतल्याचे पोलिसांना सांगितले असले तरी शव उच्छेदनात रमेश याचा मारहाणीत गाला आवळून खून झाल्याचे  सांगितले.

 

Web Title: The woman was beaten for the reason she was molested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.