रुग्णालयात महिलेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 00:58 IST2021-09-17T00:56:34+5:302021-09-17T00:58:08+5:30
गंगापूररोडवरील एका रुग्णालयात काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्याने उपचार घेणाऱ्या पुरुष रुग्णाच्या पत्नीचा विनयभंग केल्याची घटना बुधवारी (दि.१५) मध्यरात्री घडली.

रुग्णालयात महिलेचा विनयभंग
नाशिक : गंगापूररोडवरील एका रुग्णालयात काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्याने उपचार घेणाऱ्या पुरुष रुग्णाच्या पत्नीचा विनयभंग केल्याची घटना बुधवारी (दि.१५) मध्यरात्री घडली. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार संशयित प्रकाश रवींद्र टोंगारे (२७, रा. आनंदवल्ली) याच्याविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार त्यांच्या पतीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लक्ष ठेवता येईल या हेतूने पीडिता कक्षातच झोपलेल्या असताना संशयित प्रकाश याने मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या कक्षात येत अश्लील चाळे करून विनयभंग केल्याचा आरोप पीडितेने फिर्यादीत केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित प्रकाश यास अटक केली आहे.