मांजरगाव येथून तीन मुलांसह महिला बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2021 20:50 IST2021-10-19T20:42:25+5:302021-10-19T20:50:25+5:30

सायखेडा : गावी गेलेली महिला व तिची तीन मुले हे निफाड बसस्थानक येथून बेपत्ता झाल्याची तक्रार महिलेच्या पतीने सायखेडा पोलीस ठाण्यात केली आहे.

Woman missing with three children from Manjargaon | मांजरगाव येथून तीन मुलांसह महिला बेपत्ता

मांजरगाव येथून तीन मुलांसह महिला बेपत्ता

ठळक मुद्देसायखेडा : पोलीस ठाण्यात पतीकडून तक्रार

सायखेडा : गावी गेलेली महिला व तिची तीन मुले हे निफाड बसस्थानक येथून बेपत्ता झाल्याची तक्रार महिलेच्या पतीने सायखेडा पोलीस ठाण्यात केली आहे.

चांदवड तालुक्यातील काळखोडे येथील अमोल बाजीराव शिरसाठ यांनी सायखेडा पोलीस स्टेशनला तक्रार दिली की, त्यांची पत्नी वैभवी अमोल शिरसाठ (२७ ), मुलगा समृद्ध (६), स्वरा (४) व अनुश्री (दीड वर्ष) मुलींसह बुधवारी (दि. १३) दुपारी १/३० वा. मांजरगाव, ता. निफाड येथील बसस्टॅण्डवरून बेपत्ता झाली आहे. या तक्रारीनंतर सायखेडा पोलिसांनी हरविल्याची नोंद केली असून सहायक पोलीस निरीक्षक पी. वाय. कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक व्ही. एस. गायकवाड हे तपास करीत आहेत.
बेपत्ता महिला वैभवी हिची उंची ५ फूट असून रंगाने सावळी, शरीराने मजबूत, डोक्याचे केस काळे व मोठे चेहरा-गोल, नाक सरळ या वर्णनाची महिला व तिच्यासोबत तीन लहान मुले कोणास दिसल्यास अथवा कोणास काही माहिती असल्यास सायखेडा पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

Web Title: Woman missing with three children from Manjargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.