वाहनाच्या धडकेत महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 13:13 IST2018-10-31T13:13:14+5:302018-10-31T13:13:25+5:30
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे पूणे महामार्गालगत शौचालयाकडे पायी जात असलेल्या महिलेचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना ...

वाहनाच्या धडकेत महिला ठार
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे पूणे महामार्गालगत शौचालयाकडे पायी जात असलेल्या महिलेचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली. पहाटे पाच वाजेच्या सुमारास नांदूरशिंगोटे शिवारात एकविरा पेट्रोलपंपाच्या पुढे सदरची घटना घडल्याचे पोलीसांनी सांगितले. पांची रामेश्वर शर्मा (५६) असे मृत महिलेचे नाव आहे. रामेश्वर प्रसाद शर्मा रा.जयपूर (राजस्थान) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वावी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार प्रकाश गवळी हे करत आहे.