इलेक्ट्रीक मोटार जोडत असताना वीजेचा धक्का लागून महिला ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 19:40 IST2021-06-05T19:40:20+5:302021-06-05T19:40:54+5:30
पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अशोक पवार करीत आहेत.

इलेक्ट्रीक मोटार जोडत असताना वीजेचा धक्का लागून महिला ठार
चांदवड (नाशिक) - तालुक्यातील कुंदलगाव येथील 22 वर्षीय महिला मोनाली शंकर राऊत ही विजेचा धक्का लागून ठार झाली. कुंदलगाव येथील गावात शंकर गणपत राऊत यांची पत्नी मोनाली ही घरातील पाणी भरण्याकरिता इलेक्ट्रिक मोटार जोडीत असताना वायरची पीन हातात आल्याने धक्का लागून पडली. तिला पतीने मनमाड उपजिल्हा उपचारासाठी नेले असता तेथील डॉ .बाबुराव गोरे यांनी तपासून मृत घोषित केले.
चांदवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अशोक पवार करीत आहेत.