दुचाकीच्या धडकेत वृद्ध महिला जखमी
By Admin | Updated: May 6, 2014 22:02 IST2014-05-06T21:18:49+5:302014-05-06T22:02:44+5:30
नाशिक : भरधाव वेगाने जाणार्या दुचाकीस्वाराने धडक दिल्याने वृद्ध महिला जखमी झाल्याची घटना त्रिमूर्ती चौकात घडली़.

दुचाकीच्या धडकेत वृद्ध महिला जखमी
नाशिक : भरधाव वेगाने जाणार्या दुचाकीस्वाराने धडक दिल्याने वृद्ध महिला जखमी झाल्याची घटना त्रिमूर्ती चौकात घडली़ सिडकोतील धन्वंतरी कॉलेजसमोर राहणार्या मीनाबाई अनंतराव सपकाळ (६२) या रविवारी रात्रीच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना उदय प्रकाश देशमुख या भरधाव आलेल्या दुचाकीस्वाराने (एमएच १५ सीझेड- ४०५३) त्यांना जोरदार धडक दिली़ यामध्ये सपकाळ या जखमी झाल्या असून, दुचाकीचालक देशमुखवर मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)