दुचाकीवरून पडून महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 00:20 IST2020-02-24T23:54:22+5:302020-02-25T00:20:41+5:30
दुचाकीवरून पडल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी ( दि. २४) सटाणा-ताहाराबाद रस्त्यावरील तरसाळी फाट्याजवळ घडली. निकिता गोरख ठाकरे असे मृत महिलेचे नाव आहे.

दुचाकीवरून पडून महिलेचा मृत्यू
सटाणा : दुचाकीवरून पडल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी ( दि. २४) सटाणा-ताहाराबाद रस्त्यावरील तरसाळी फाट्याजवळ घडली. निकिता गोरख ठाकरे असे मृत महिलेचे नाव आहे.
गणेशपूर (ता. साक्र ी, जि . धुळे ) येथील अल्पभूधारक शेतकरी गोरख आनंदसिंग ठाकरे यांच्या अकरा महिन्यांच्या मुलाची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला सटाणा येथे उपचारासाठी जात होते. वडील आनंदसिंग ठाकरे यांना रु ग्णालयात नंबर लावण्यासाठी रविवारी दुपारी बसने सटाणा येथे पाठवले होते. दुपारी १२ वाजेच्या सुमारास तरसाळी फाट्याजवळ खड्ड्यात दुचाकी आदळल्याने अपघात झाला. त्यात या महिलेचा मृत्यू झाला. दुचाकीवर अकरा महिन्यांच्या आदित्यला कवेत घेऊन बसलेल्या निकिता यांचा तोल गेला आणि त्या रस्त्यावर पडल्या. याचवेळी गोरख यांचाही दुचाकीवरील ताबा सुटून घसरले. या अपघातात निकिता यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्या जखमी झाल्या. डोक्यातून रक्तस्त्राव होत होता. मात्र, या परिस्थितीतही त्यांनी चिमुकल्या आदित्यला घट्ट धरून त्याचा जीव वाचवला. तर गोरख यांच्या गुडघ्याला मार लागल्याने ते जखमी झाले. तसेच चार वर्षांच्या पार्थला सुदैवाने कोणतीही इजा झाली नाही. अपघात घडल्यानंतर जखमी निकिताला शहरातील एका खासगी रु ग्णालयात हलविले. डॉक्टारांनी निकिताचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.