अंगावर वीज पडून महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 01:15 IST2020-09-09T23:10:04+5:302020-09-10T01:15:07+5:30

सुरगाणा : अंगावर वीज पडून शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील आळीवपाडा येथे बुधवारी (दि.९) दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.

Woman dies after being electrocuted | अंगावर वीज पडून महिलेचा मृत्यू

अंगावर वीज पडून महिलेचा मृत्यू

ठळक मुद्दे तत्काळ सुरगाणा ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले.

सुरगाणा : अंगावर वीज पडून शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील आळीवपाडा येथे बुधवारी (दि.९) दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.
बायजाबाई मधुकर जोपळे (४८) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. येथून जवळच असलेल्या अळीवपाडा येथील बायजाबाई या पती मधुकर यांच्यासोबत शेतात नींदणीचे काम करीत असताना पावसाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे मधुकर यांनी बायजाबाई यांना घरी जाण्यास सांगितले. परतत असताना दुपारी दीड वाजेच्या दरम्यान वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरु झाला. यावेळी बायजाबाई यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. तत्पुर्वी ग्रामस्थांनी त्यांना तत्काळ सुरगाणा ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक सागर नांद्रे करित आहेत.
फोटो : 09 सुरगाणा

 

Web Title: Woman dies after being electrocuted