कोब्रा चावल्याने महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2022 23:02 IST2022-07-11T23:01:21+5:302022-07-11T23:02:34+5:30
नांदगाव : तालुक्यातील बाणगाव बुद्रूक येथील महिला शेतात काम करीत असताना विषारी कोब्रा सर्पाने दंश केला. तिला त्वरित नांदगाव येथील रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सरला गोराडे (३५) असे मयत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे गोराडे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

सरला गोराडे

याबाबत अधिक माहिती अशी की, सरला रवींद्र गोराडे स्वतःच्या शेतात पत्र्याच्या घरात राहत होत्या. सायंकाळी नेहमी प्रमाणे घराच्या अंगणात भांडी घासत असताना अचानक पाठीमागून विषारी कोब्रा सापाने दंश केला. तातडीने त्यांनी सर्पदंशाची माहिती घरात सांगितल्यावर नांदगावच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे उपचार केले. पण विष रक्तात मिसळल्याने उपचारास प्रतिसाद मिळाला नाही. अखेर सरलाचा मृत्यू झाला. सरला गोराडे यांची घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने शासनाच्या आपत्ती निवारण निधीतून गोराडे कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.