अशोकामार्गावर पायी जात असलेल्या महिलेची पोत खेचली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 00:39 IST2018-09-18T00:38:46+5:302018-09-18T00:39:00+5:30
पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील ७० हजार रुपयांची सोन्याची पोत दुचाकीवर आलेल्या संशयितांनी खेचून नेल्याची घटना रविवारी (दि़१६) रात्री अशोकामार्गावरील आदित्यनगरच्या कॉलनी रोडवर घडली़

अशोकामार्गावर पायी जात असलेल्या महिलेची पोत खेचली
नाशिक : पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील ७० हजार रुपयांची सोन्याची पोत दुचाकीवर आलेल्या संशयितांनी खेचून नेल्याची घटना रविवारी (दि़१६) रात्री अशोकामार्गावरील आदित्यनगरच्या कॉलनी रोडवर घडली़
सद््गुरू अपार्टमेंटमधील रहिवासी छाया प्रकाश कोतले या रात्री आठ वाजेच्या सुमारास अशोकामार्गाकडे कॉलनीरोडने पायी जात होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या संशयिताने त्यांच्या गळ्यातील ३५ ग्रॅम वजनाचे ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र खेचले व फरार झाला़
सिंहस्थनगरला घरफोडी
बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेल्याची घटना सिडकोतील सिंहस्थनगरमध्ये घडली आहे़ १५ व १६ सप्टेंबर रोजी चोरट्यांनी सिंहस्थनगरमधील रहिवासी अक्षय खैरनार यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला़ तसेच घरातील कपाटातून २० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत, सात हजार रुपये किमतीचे दोन सोन्याचे ओम पान व दहा हजार रुपयांची रोकड असा ३७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़