शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

महिला वाहक म्हणतात... मेरी खाकी नही दुंगी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 1:08 AM

नाशिक : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या गणवेशामध्ये सत्तर वर्षांत प्रथमच बदल करण्यात आला आणि मागीलवर्षी कर्मचाऱ्यांना थेट गणवेश शिवूनही ...

नाशिक : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या गणवेशामध्ये सत्तर वर्षांत प्रथमच बदल करण्यात आला आणि मागीलवर्षी कर्मचाऱ्यांना थेट गणवेश शिवूनही देण्यात आला. यामध्ये महिला वाहकांच्या गणवेशातही आमूलाग्र बदल करण्यात आला होता. मात्र गेल्या वर्षभरापासून महिला वाहक या बदललेल्या गणवेशाला विरोध करीत असून, पूर्वीप्रमाणेच महिला वाहकांना खाकी गणवेश देण्यात यावा यासाठी लढत आहेत. याप्रकरणी गेल्या शुक्रवारी राज्यभरातील महिला वाहक प्रतिनिधींनी एसटीच्या व्यवस्थापकीय संचालकांची भेट घेऊन ‘मेरी खाकी नही दूंगी’ असा नारा दिला.राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचा खाकी गणवेश सर्वश्रृत आणि सर्वमान्य असा गणवेश आहे. गेल्यावर्षी महामंडळाने यामध्ये बदल करून चालक, वाहक, कार्यशाळा कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, सुरक्षारक्षक यांना वेगवेगळ्या रंगांचा गणवेश निश्चित केला. पुरुष चालक-वाहकांना पूर्वीप्रमाणे खाकी गणवेश कायम ठेवण्यात आला. मात्र महिला वाहकांना हिरवट रंगाचा गणवेश आणि चॉकलेटी रंगाचा अ‍ॅप्रन असा गणवेश बहाल केला. या गणवेशाचे वाटपही करण्यात आले. मात्र हा गणवेश महिला कर्मचाऱ्यांना काही रुचला नाही. प्रत्यक्ष कामकाज करताना खाकी गणवेश म्हणून जो सन्मान मिळत असे त्या प्रकारचा सन्मान बदललेल्या गणवेशातील महिला कर्मचाºयांना मिळत नसल्याचा अनुभव आल्याने त्यांनी सदर गणवेश बदलावा यासाठी महाराष्टÑ एसटी कामगार संघटनेच्या निर्भया समितीच्या माध्यमातून लढा सुरू केला आहे. याप्रकरणी राज्यातील महिला वाहकांच्या सह्यांचे निवेदनदेखील व्यवस्थापकीय संचालकांना पाठवून महिला वाहकांच्या भावना कळविण्यात आलेल्या आहेत, परंतु या कुठल्याच बाबीची प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे गेल्यादि. १७ रोजी महाराष्ट्रातील विविध विभागांतील निर्भया प्रतिनिधी मुंबई मध्यवर्ती कार्यालयावर धडकल्या. यावेळी त्यांनी उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल तसेच महाव्यवस्थापक माधव काळे, मध्यवर्ती कार्यालयाचे मुख्य कामगार अधिकारी प्रताप पवार यांना भेटून नवीन गणवेशाबाबतच्या अडचणी कथन केल्या. महिला वाहकांना खाकी रंगाचा दर्जेदार गणवेशाचा कपडा व शिलाई भत्ता देण्यात यावा त्यामुळे महिला वाहक मोजमापाप्रमाणे गणवेश करून घेतील, अशी मागणी करण्यात आली. गणवेशाऐवजी महिला वाहकांना खाकी सलवार-कमीज किंवा खाकी साडी देण्याची विनंतीही व्यवस्थापकीय संचालकांकडे करण्यात आली.या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महिला कामगारांचे प्रश्न विभागाचे कामगार अधिकारी यांनी आपल्या आगार भेटीतच सोडविले पाहिजे. महिला कामगारांशी चर्चा करून त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करणे अपेक्षित आहे. यावेळी देओल यांनी सर्व विभाग नियंत्रकांना सूचना देण्यात येतील, असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले. निर्भया सदस्यसोबत महिला कामगारांचे इतर मुद्दे मांडण्यासाठी कामगार संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे, उपाध्यक्ष शीला नाईकवाडे, आशा घोलप यांनी पुढाकार घेऊन निर्भया सदस्यांच्या प्रश्न संदर्भाची व्यापक चर्चा घडवून आणून खाकीची लढाई मुंबईपर्यंत पोहचविली.काय आहेत अडचणीखाकी गणवेशाला मिळणारा सन्मान नव्या गणवेशाला मिळत नाही.सध्याच्या गणवेशाचे कापड अत्यंत जाड.चॉकलेटी अ‍ॅप्रनमुळे वाहकाविषयीचे गांभीर्य घटले.मापात गणवेश नसल्याने नीटनेटकेपणा राहत नाही.खाकी नसल्याने प्रवाशांकडून वाहकांचा अवमान.खासगी कर्मचारी म्हणून समज.अ‍ॅप्रनची लांबी अधिक असल्याने गैरसोय.गणवेशाचा रंग उडाल्याने मळलेला दिसतो.महिला वाहकांना देण्यात आलेला गणवेश हा महामंडळाचे कर्मचारी म्हणून अजिबात वाटत नाही. पूर्वी खाकी गणवेश असल्यामुळे प्रवाशांकडून सन्मान मिळत होता. गणवेश असताना कुठेही गेले तरी आदरपूर्वक वागणूक मिळत होती. त्यामुळे महिला वाहकांसाठी खाकी गणवेश सुरक्षित होता. पूर्वीप्रमाणेच महिला वाहकांचा गणवेश खाकी करावा यासाठी ‘मेरी खाकी नही दूंगी’ असा लढा सुरू केला आहे. - शीला नाईकवाडे, केंद्रीय उपाध्यक्ष, कामगार संघटनावाहकांचा सन्मान राखावा अशा आहेत मागण्यामहिला वाहकांना खाकी रंगाचा दर्जेदार गणवेशाचा कपडा व शिलाई भत्ता देण्यात यावा. त्यामुळे महिला वाहक आपल्या मोजमापाप्रमाणे गणवेश करून घेतील, अशी मागणी करण्यात आली. सध्याच्या गणवेशाऐवजी महिला वाहकांना खाकी सलवार-कमीज किंवा खाकी साडी देण्याबाबतची विनंतीही व्यवस्थापकीय संचालकांकडे करण्यात आली.

 

टॅग्स :Nashikनाशिक