लांडग्याने केल्या शेळ्या फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 18:10 IST2019-12-25T18:09:49+5:302019-12-25T18:10:41+5:30
राजापूर : येवला तालुक्यातील पन्हाळसाठे येथील चार शेळ्या लांडग्याने फस्त केल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

लांडग्याने केल्या शेळ्या फस्त
ठळक मुद्देया घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राजापूर : येवला तालुक्यातील पन्हाळसाठे येथील चार शेळ्या लांडग्याने फस्त केल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
येवला नांदगाव रस्त्यालगत पन्हाळा पाटी जवळ रामदास खाडे यांचे शेत आहे. तेथील शेतात शेळया बांधलेले असताना अचानक लांडग्याने हल्ला चढवल्याने चार शेळ्या लांडग्याने फस्त केल्या.
दुपारी बारा वाजेच्या दरम्यान सदर घटना घडल्यानंतर त्याची माहिती वनविभागाला दिली असून वनपाल पवार यांनी तसेच तलाठी रोखले यांनी पंचनामा केला आहे. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
(फोटो २५ राजापूर)